Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागेशवाडी येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वृक्षारोपणं कार्यक्रम.

 नागेशवाडी येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वृक्षारोपणं कार्यक्रम.

-----------------------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजितसिंह ठाकुर

-----------------------------------------------------

 पृथ्वीवरील सजिव सृष्टी निरोगी व जिवंत ठेवण्याकरिता वृक्षांचे फार मोठे योगदान आहे,यामध्ये तिळमात्र शंका नाही.जमीन आणि जंगलाचे रक्षण करण्याकरिता तत्कालीन ब्रिटिश सरकार विरोधात झारखंड राज्यातील आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा ह्यांनी आजच्या प्रत्येक युवकाने आत्मसात करावी अशी फार मोठी क्रांति घडवुन आणली. त्यांच्या ह्या प्रेरणादायी शौर्याच्या स्मरणार्थ नागेशवाडी येथे दि.15 नोव्हेंबर रोजी वृक्षांरोपणं करून जननायक बिरसा मुंडा ह्यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त गजानन महादेव आप्पा मुलंगे ह्यांनी केले. कार्यक्रमाकरिता ग्रा.पं. सरपंच सीताबाई घाटोळ,उपसरपंच तुळसाबाई टारफे,सदस्यगण.बालाजी टारफे,गजानन नाईक,विनायक चौरे, श्रीरंग नाईक,नरहरी नाईक,विश्वनाथ सावंत,ग्रामसेवक राम चौधरी,वृक्षमित्र मदन चौधरी,जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव नाईक, बालाजी सावंत,प्रशांत मेटकर,सचिन नाईक,पोलीस पाटील पांडुरंग कऱ्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते.श्मशान भुमी, मारोती मंदिर तसेच गोकर्णेश्वर मंदिर परिसरात वड,पिंपळ, कडुनिंब,ईत्यादी 251 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे महत्व विशद करतांना मुलंगे पुढे म्हणाले की, थ विश्व त्रस्त झाले आहे. आठ दिवसापूर्वी देशाची राजधानी दिल्लीमध्ये वायुप्रदूषणा मुळे हाहाकार उठला होता, हे विसरून कसे चालणार?कृत्रिम पद्धतीने ह्या वर थातुर-मातुर तोडगा काढता येईल पण, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वृक्षारोपणं व त्यांचे संवर्धन ह्या शिवाय गत्यंतर नाही.हिचं जननायक बिरसा मुंडा ह्यांना शाश्वत श्रद्धांजली होईल असे परखड मत त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले.गावातील वृक्षप्रेमींनी प्रत्येकी एक झाड जगविण्याचा संकल्प ह्या प्रसंगी केला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर थोरात,अनिल नाईक, सुदाम सोनूने,सुहास बेले व बिरसा मुंडा जयंती समिती मित्रमंडळ इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments