Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे यास हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी केली कारवाई..

 तडीपार गुंड अविनाश प्रताप काटे यास हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी केली कारवाई..

-----------------------------------------------------------------

 -----------------------------------------------------------------
मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो. सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दिनांक 04/11/2023 रोजी रात्री कराड गावातील सराईत तडीपार गुंडाच्या मुसक्या आवळल्या.

        कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अविनाश प्रताप काटे हा दोन वर्षा साठी हद्दपार केला असून देखील अविनाश हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील कराड बस स्थानक येथे येऊन दहशत माजवत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.एल. डांगे सो. यांना मिळाली होती पोलीस उपनिरीक्षक आर.एल. डांगे सो. हे तात्काळ डी.बी. पथकासह नमूद  ठिकाणी पोहोचले व तडीपार गुंड नामे अविनाश प्रताप काटे याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.एल. डांगे, सफौ देसाई,सफौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस नाईक कुलदीप कोळी, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments