Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वनविभागाचे दुर्लक्ष शाळेकरी मुलीचा हकनाक बळी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार.

 वनविभागाचे दुर्लक्ष शाळेकरी मुलीचा हकनाक बळी बिबट्याच्या हल्ल्यात  बालिका ठार.

----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

----------------------------------

शाहूवाडी: तालुक्यातील विद्या मंदिर तळीचा वाडा येथील इ.दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, निष्पाप निरागस बालिका ठार

या दोन वर्षात ही तिसरी घटना आहे... शाहूवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. बिबटे, गवे रानडुकरे इत्यादी प्राण्यांनी धुमाकूळ माजवला आहे. आपल्या आजूबाजूला असे निष्पाप बळी जाणार आणि आम्ही पण नुसते पहात बसण्या पलीकडे काहीच करू शकत नाही.

       आता शासनाकडून किती जरी मदत मिळाली तरी या बालिकेच्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरायचे.. शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी नागरिक आणि वनविभाग यांनी तात्काळ विचार विनिमय करून वन्यप्राणी मानवी वस्तीत येणार नाहीत यासाठी चिरकाल टिकणारे उपाय करणे गरजेचे आहे  भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्या पलिकडे आम्ही काही ही करू शकत नाही का? एखादा शेतकरी जंगलामध्ये कोयता किंवा शस्त्र जंगलात घेऊन गेला तर वनाधिकारी कायद्याची भाषा बोलतात परंतु सर्वसामान्यांचा जीव जातो तेव्हा ते कुठे असतात तसेच वन अधिकारी यांनी शेतकऱ्यांना त्रास न देता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अन्यथा आम्हाला परवानगी द्या आम्ही बघतो वन्य  काय करायचे ते कारण आम्ही हा त्रास कायम सहन करणार नाही तसेच एखाद्या वन्य प्राण्याचे काहीतरी बरे वाईट झाले तर तुम्ही  वन अधिकाऱ्यांनी विचारायचे नाही असे चर्चा शेतकरी वर्गात चालू आहे

Post a Comment

0 Comments