Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हातकणंगले आनंदाचा शिधा वाटप.

 हातकणंगले आनंदाचा शिधा वाटप.

--------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

दत्तात्रय कोळेकर

-------------------------------- 

 हातकणंगले तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील 69 हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत असून त्याची सुरुवात आज खासदार धैर्यशील माने आमदार राजू बाबा आवळे यांच्या उपस्थितीत करण्यातआली.


 हातकणंगले तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील 69 हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्यावेळी बोलताना  'शासन आपल्या दारी' या उपक्रमातुन मुख्यमंत्री थेट प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचण्याचे काम करीत आहेत. चांगल्या-वाईट वेळी शासन नेहमी आपल्या पाठीशी उभे आहे. तरी याचा लाभ जास्तीजास्त नागरिकांनी घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सव्वाशे कोटी जनतेला दीपावली भेट म्हणून पुढील पाच वर्ष रेशन धान्य दुकानात धान्य मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ही सर्वसामान्य जनतेसाठी शासनाची दरवाजे खुली केली आहेत. असे मत खास. धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. ते  हातकणंगले  तहसिल कार्यालयात आनंदाचा शिधा  या किटच्या वाटप प्रसंगी बोलत होते. 

          आम. राजुबाबा आवळे यांनी आनंदाचा शिधा किटचे वाटप नियोजनबद्ध करण्यात यावे. कोणीही वंचित राहु नये . याची दक्षता घेण्याचा सल्ला दिला. या कीट मुळे 69 हजार कुटुंबांना दीपावलीचा शिधा मिळणार आहे.यावेळी तहसिलदार कल्पना ढवळे - भंडारे यांनी ६९००० शिधा किट हातकणंगले तहसिल कार्यालयाच्या आखत्यारीतील गावामध्ये वाटप होणार असल्याचे सांगितले.

        कार्यक्रमास प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले,  हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर , माजी पंचायत समिती सदस्य  संतोष माळी ,अजित पाटील, पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांच्यासह कार्यलयातील कर्मचारी , लाभार्थीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments