किसन वीर महाविद्यालयात "साहित्यावर आधारित चित्रपट" विषयावरील भित्तिपत्रक प्रदर्शन.
किसन वीर महाविद्यालयात "साहित्यावर आधारित चित्रपट" विषयावरील भित्तिपत्रक प्रदर्शन.
---------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------
वाई: येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात इंग्रजी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "साहित्यावर आधारित चित्रपट" या विषयावर भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये इंग्रजी विभाग तसेच बी.सी.ए. विभागातील एकूण 50 विद्यार्थ्यांनी वेगवेगळी भित्तिपत्रके बनवून सहभाग घेतला. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी नटसम्राट, नटरंग, श्यामची आई, अंगूर, राजी, दिल बेचारा, पद्मावत, बाजीराव मस्तानी, 2 स्टेट्स, गाईड, 3 इडियट्स, गॉडफादर, इ. साहित्यकृतींवर आधारित चित्रपटांवर भित्तीपत्रके सादर केली. यापैकी दिल बेचारा (ऋतुजा कोचळे), 2 स्टेट्स (सानिया व मुस्कान काजी), राजी (विशाखा वरे), असुरान (हर्षल पवार व अक्षय बेलोशे) व नटसम्राट (नम्रता खुडे) या भित्तिपत्रकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांक मिळाले. परीक्षक म्हणून डॉ. मनोज गुजर व डॉ. रवींद्र बकरे यांनी काम केले. स्पर्धेचे संयोजन इंगजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी केले.
इंग्रजी विभागातील डॉ. बाळासाहेब मागाडे, डॉ. अंबादास सकट, प्रा. रेश्माबानो मुलाणी, प्रा. जयवंत खोत, प्रा. संतोष मुळीक, प्रा. संतोष चौगुले व प्रा. सचिन गरगडे यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment