दूध उत्पादकांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवा. अन्यथा प्रहार शी गाठ स्वामी.
दूध उत्पादकांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवा. अन्यथा प्रहार शी गाठ स्वामी.
--------------------------------
पंढरपूर/प्रतिनिधी
--------------------------------
मंगळवेढा तालुक्यात खाजगी दुध संस्था कडुन मनमानी कारभार सुरु आहे. राज्य शासनाने 34 रुपये दर जाहीर करून सुद्धा दुधाला कमी भाव देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम खाजगी दुध संस्था करत आहेत.
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तसेच महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यामध्ये मीटिंग घेऊन किमान 35 रुपये दर भेटलाच पाहिजे असे सांगितले होते यानंतर बैठक होऊन राज्य शासना कडुन 34 रुपये दर निश्चित करण्यात आला परंतु काही संस्थांच्या कडून शेतकऱ्यांना लुटण्याच सत्र सुरूच आहे. त्या संस्थाचालकांना तात्काळ चपराक लावण्यात यावी, चालू दर 34 रुपये प्रमाणे दूध खरेदी करण्यात यावे तसेच मागील बिल 34 प्रमाणे अदा करण्यात यावे अशा पद्धतीचा परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी मा.जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांना फोन द्वारे मिटींग लावण्यास सांगितले.
जिल्हा अधिकारी शेतकऱ्यांनवरती अन्याय होउ देणार नाहीत.असा आम्हाला विश्वास आहे.
जर दुध दर शासनाने जाहिर केल्याप्रमाणे दुध उत्पादकांना नाही मिळाला
तर मा. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील व शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ति पक्षाचे कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी , युवाजिल्हा संतोष पवार, सरचिटणीस श्रीपाद पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत ,शहर अध्यक्ष सिध्देश्वर पाटील,संघटक अजित टकले,तालुका संपर्क प्रमुख तानाजी माने,महिला प्रमुख सारिका कवचाळे उपाध्यक्ष प्रकाश मेटकरी, चेतन वाघमोडे, राकेश पाटील विभाग प्रमुख नवनाथ शिरशटकर,संपर्क प्रमुख महेश तळ्ळे,विठ्ठल चौगुले, महम्मद ढालाईत, शेतकरी रंगसिद्ध आसबे, बिराप्पा कुंभार, शशी उकरंडे, विशाल पाटील, सागर म्हमाणे, बजरंग साळुंखे, मुकेश कोरे,सचिन पाटील, विनायक पारसे,दिलीप गणेशकर इ.शेतकरी ,पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment