Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच व ग्रामसेवकांचा प्रताप परस्पर प्लाॅट ग्रामपंचायतला लावला.

 सरपंच व ग्रामसेवकांचा प्रताप परस्पर प्लाॅट ग्रामपंचायतला लावला.

------------------------------

नांदेड प्रतिनिधी

------------------------------

 लोहा तालुक्यातील कापसी बु येथील एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीचा प्लाॅट ग्रामसेवक व सरपंच यांनी मुळ मालकांची परवानगी न घेता प्लाॅट परस्पर इतरांच्या नावावर लावल्याने झालेल्या वादातून दोन जणांत जबर हाणामारी झाली असून एका जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर प्रकरणास ग्रामसेवक गोविंद माचनवाड जबाबदार असल्याचा आरोप अरविंद पट्टेकर यांनी केला आहे.

उस्माननगर पोलिस ठाण्यात अरविंद उमाजी पट्टेकर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, कापसी बु येथील संदीप ऊर्फ अर्जुन हाळदे यांच्याकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. पण सदर पैसे परत करत असताना त्यांच्या नावांवर असलेला मालकीचा प्लाॅट हा ग्रामसेवक गोविंद माचनवाड यांनी सरपंच यांच्या मदतीने विनापरवानगी संदीप उर्फ अर्जुन हाळदे यांच्या नावांवर ग्रामपंचायतला लावला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी गेलो असता सरपंचाच्या घरासमोर वादातून सुरू झाली. संदीप उर्फ अर्जुन हाळदे यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दाखल केली. अरविंद पट्टेकर यांच्या तक्रारीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा व गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कंधारचे उपविभागीय पोलिस अधिकारी मारोतीराव थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी अरविंद पट्टेकर यांनी या सर्व प्रकरणास ग्रामसेवक गोविंद माचनवाड व सरपंचाचे पती जबाबदार असल्याचा आरोप केला असून संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments