Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मौजे वडगांव बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करा!

 मौजे वडगांव बारकी पाणंद रस्त्यावर भुयारी मार्ग करा!

---------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोळी प्रतिनिधी

अमित खांडेकर 

---------------------------------------

 मौजे वडगांव येथील बारकी पाणंद रस्त्यावर भुयारीमार्ग करावा आशा मागणीचे निवेदन मौजे वडगांव ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम . हसन मुश्रीफ व खास . धैयशिल माने यांना दिले .

           सध्या नागपूर रत्नागिरी या नविन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पण हा रस्ता करत असतांना शेतकऱ्यांच्या अडी- अडचणीचा विचार न करता काम सुरू आहे. मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील बारकी पाणंद म्हणून प्रसिध्द असणऱ्या व गावातील सातशे ते आठशे एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणंद रस्त्याचा वारंवार वापर करावा लागतो .

          गावच्या गायराण व पाझर तलावाकडे जातांना गावातील शेतकरी जनावरे चरणेसाठी, शेतातील गोठ्यामध्ये धारा काढणेसाठी, शेतींची मशागत करणेसाठी ' दिवस व रात्रीचे शेतीपिकांना पाणी पाजणेसाठी, तसेच रोजंदारीवर काम करण्यासाठी लागणारे शेतमजूर, ऊस वाहतूकीचे ट्रॅक्टर , या सर्वांना याच पाणंद रस्त्यांचा वापर करावा लागतो. तसेच गेल इंडिया , HPCL व BPCL यासारखे शासनाचे मोठे प्रकल्प गायराना मध्ये असल्याने जाणे येणेसाठी याच पाणंद रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागणार आहे. . तसेच या अगोदर रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार केला आहे . त्यामुळे या पाणंद रस्त्यांवर भुयारी मार्ग करणे अत्यंत्य गरजेचे आहे. अशी मागणी ग्रा पं . शिष्टमंडळाने केली . यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी दिपावली नंतर केंद्रिय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले .

            या शिष्टमंडळामध्ये उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले , प्रकाश कांबरे , आनंदा थोरवत, अमोल झांबरे , अमर थोरवत, उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments