Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर घरात घुसून वृद्ध दांपत्याला मारहाण.

 गांधीनगर घरात घुसून वृद्ध दांपत्याला मारहाण.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

--------------------------------------

पैशाच्या देवाणघेवणाच्या कारणावरून गांधीनगर मधील तीन युवकांनी श्यामलाल पंजवाणी आणि त्यांची पत्नी किरण पंजवानी यांना धारदार शस्त्र आणि काचेच्या बाटलीने मारून गंभीर जखमी केले. गांधीनगर मध्ये घरात घुसून महिलांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गांधीनगर पोलिसांच्या कडून जुजबी कारवाई होत असल्याने अश्या घटनेत वाढ होत असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे. 

या घटनेची आधीक माहिती अशी की,


करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील वसंत शहा कॉलनीमध्ये श्यामलाल कवडामल पंजवाणी वय 55 हे पत्नी आणि कुटुंबासह राहत आहेत.त्यांची मुले बाहेरगावी गेली होती याचवेळी गांधीनगर मध्ये राहणाऱ्या आशिष गोपीचंद कामरा, अमित राजकुमार कामरा, रवि अशोकलाल दयालानी या युवकानी दिनांक 13 रोजी रात्री अकराच्या दरम्यान पंजवानी यांच्या घरात घुसून जुन्या व्यवहारातील पैशाच्या वादावरून श्यामलाल पंजवानी यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून गंभीर जखमी केले. वाद सोडवायला आलेल्या श्यामलाल यांची पत्नी किरण यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. संशयित आरोपींनी मारहाणीत चाकू आणि बाटलीचा वापर केला होता. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती याबाबत शामलाल पंचवानी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावर गांधीनगर पोलिस आणि तिघांच्यावर कारवाई केली आहे. गांधीनगर परिसरामध्ये घरात घुसून महिलांच्यावर हल्ला करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गांधीनगर पोलिसांच्या कडून कठोर कारवाईसाठी पावले उचलणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या अनेक घटना या काही दिवसात घडले असून महिलांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याची भीती न राहिल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असून संशयित आरोपींच्यावर कठोरातील कठोर कलमांच्याद्वारे कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याची भीती निर्माण झाल्यास भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

Post a Comment

0 Comments