Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य.

 जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य.

------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जावळी प्रतिनिधी 

चंद्रशेखर जाधव 

------------------------------------------

जावली गौरव पूरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न.

सोहळ्यास सिनेअभिनेते विजय निकम यांची उपस्थिती.

मेढा,ता.०७: जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मित्रमेळा फाउंडेशन जावली या सामाजिक संस्थेकडून जावली गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. यात तालुक्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. यावेळी हा सोहळा मोठ्या थाटामाटात मेढा येथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते विजय निकम, जेष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, लेखक विशाल बांदल, ढोलकीच्या तालावर फेम काजल गोसावी उपस्थित होत्या.

जावली तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मित्रमेळा फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जावली तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान जावली गौरव पुरस्कार देऊन करण्यात येतो. यावेळी मानाचा जावली नाट्यगौरव पुरस्कार २०२३ हा  अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम करणाऱ्या हिंदुराव दौलती जाधव यांना प्रदान करण्यात आला. नाट्यचळवळ पुरस्कार हा केदारेश्वर नाट्य विकास मंडळ मामुर्डी यांना देण्यात आला. तर जावली सामाजिक गौरव पूरस्कार स्वर्गीय विजयराव मोकाशी यांना मरणोत्तर देण्यात आला. तसेच अध्यात्मिक साठी प्रवीण महाराज शेलार, शिक्षण क्षेत्रासाठी प्रमोद घाटगे, शेखर भिलारे, आनंदा जूनघरे, सायली शेलार साहित्यसाठी हरिशचंद्र भोसले, पर्यावरणसाठी सह्याद्री प्रोटेक्टर्स, कलासाठी सचिन जंगम, संगीतसाठी शंकरराव पवार, कृषीसाठी तुषार सपकाळ, क्रीडासाठी सुदेशना शिवणकर, प्रणित शेलार यांना जावली गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी संस्कृती महिला मंडळ मेढा व डांगरेघर ग्रामस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

यावेळी अभिनेते विजय निकम यांनी बोलताना मित्रमेळा संस्थेचे कौतुक केले. असे उपक्रम आणि सोहळे फक्त जावली तालुक्यातच होतात असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. तसेच सदाभाऊ सपकाळ यांनी बोलताना संस्थेच्या उपक्रमांना भविष्यात लागणारी सर्व मदत करणार असल्याचे सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, लेखक निलेश महिगावकर, प्रकाश बडदरे तसेच तालुक्यातील पत्रकार व  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमेळा संस्थेच्या सदस्यांनी कष्ट घेतले.


फोटो:मेढा: हिंदुराव जाधव यांना जावली गौरव पुरस्कार प्रदान करताना अभिनेते विजय निकम, सदाशिव सपकाळ, एकनाथ ओंबळे आदी.

Post a Comment

0 Comments