Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उद्योजक श्री धनाजी विठ्ठल पाटील यांची शिरोली विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी निवड.

 उद्योजक श्री धनाजी विठ्ठल पाटील यांची शिरोली विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी निवड.

------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

------------------------------------

शिरोली येथील मातृ  संस्था असलेल्या शिरोली विकास सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उद्योजक धनाजी विठ्ठल पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदी मदन पांडुरंग संकपाळ यांची एकमताने  निवड करण्यात आली. या विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्धानी हातकणंगले उपनिबंधक  डॉ. एस. एन. जाधव हे होते.

या संस्थेवर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे.  पदाधिकार्यांच्या नावाचे पत्र बंद पाकीटातून पाठवले होते. त्यानुसार या दोन्ही निवडी जाहीर  करण्यात आल्या. 

या निवडीकामी माजी आमदार अमल महाडिक, राजाराम साखरचे जेष्ठ संचालक दिलीप पाटील व पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

नुतन पदाधिकार्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पुगुच्छ , शाँल , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तर निवडणूक अधिकारी जाधव  यांचा सत्कार दिलीप पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, दिलीप पाटील, नूतन चेअरमन धनाजी पाटील, माजी सरपंच तात्यासो पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील, क्रूष्णात करपे, महंमद महात, डॉ. सुभाष पाटील यांची भाषणे झाली.

या निवड सभेस शब्बीर देसाई, अनिल शिरोळे, बी.एस.पाटील, उदयसिंह  पाटील, क्रूष्णात खवरे, नारायण मोरे, प्रकाश कौंदाडे,   रामभाऊ बुडकर, जग्गनाथ पाटील, सलिम महात, विजय जाधव, संपत संकपाळ, आरीफ सर्जेखान, श्रीकांत कांबळे, क्रूष्णात उनाळे, धनाजी यादव, सदाशिव संकपाळ, योगेश खवरे, संभाजी पाटील,  दिलीप शिरोळे, दिपक यादव,यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

स्वागत व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांनी विषय वाचन  केले, आभार मदन संकपाळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments