Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राक्षी येथील कुंभार बंधुच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले पाच संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी!

  राक्षी येथील कुंभार बंधुच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले पाच संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी! जोतीराम सदाशिव कुंभार व.व64 व नायकु सदाशीव कुंभार व .व.60 या दोन भावांचा नाळव्यामध्ये वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने जागीच दोघांचा मृत्यू झाला होता.या झालेल्या अपघाताची उकल करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पन्हाळा पोलीस दलास यश आले आहे. पाच जणाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

, सदर आरोपी राक्षी गावातील असल्यामुळे गावांमधील शांतता भंग होऊ नये म्हणून आरोपीबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि पन्हाळा पोलीस प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा राक्षीमधील गावकर्यातून दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. 

या घटनेची अधिक माहिती अशी की,

 पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षी गावातील जोतीराम सदाशिव कुंभार व नायकु सदाशिव कुंभार हे दोघे भाऊ बुधवारी रात्री 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास खेकडे पकडायला ओढ्यावर गेले असता वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी नाळव्यामध्ये लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लपवून ठेवण्यासाठी वन्य प्राणी पकडण्यासाठी फास लावणार्या आरोपी यांनी कुंभार बांधवांचे मृतदेह राक्षीमधील वाघजाई मंदिरा नजीकच्या पावन गडाच्या पायथ्याशी जंगलात नेऊन टाकले होते. घटना घडून चार-पाच दिवसानंतर सोमवारी कुंभार बंधूंचा शोध सुरू होता. सोमवारी दुपारनंतर या दोन्ही बांधवांचा मृतदेह पावन गडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात सडलेल्या अवस्थेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळून आला. पन्हाळा पोलीस आणि गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज सोमवारी मृतदेह ताब्यात घेऊन पन्हाळा येथील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यास मुखाग्नी देण्यात आला 


आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

------------------------------------

विद्युत तारेचा करंट बसल्यावर आवाज झाला वन्य प्राण्यांची शिकार करणार्यांना वाटलं वन्य प्राणी मेला असेल म्हणून विद्युत प्रवाह बंद करून घटनेच्या ठिकाणी आरोपी आले असता त्यांनी कुंभार बधू निपचित पडल्याचे पाहून त्याची पाचावर धारण बसली मग त्यांनी कुंभार बधू चे मृतदेह खांद्यावर घेऊन पावन गडाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट खात्याच्या दाट झाडीत फेकून दिले.


संशयाची सुई बळावली.

-------------------------------------

सगळे जंगल पिंजून झालं तरी कुंभार बंधूंचा शोध लागत नव्हता राक्षी गावांमध्ये झालेल्या गाव मीटिंगमध्ये सर्व गावकरी उपस्थित होते परंतु वन्य प्राण्यांची शिकार करणारे पाच जण अनुक्रमे १)शिवाजी बाळू राऊत व.व.47 २)सागर शंकर निरुखे व.व. ३४ ३) अंकुश भगवान राजंगणे व.व.३१ ४) हेमंत गणपत तोरस्कर व.व.४३ ५) जयवंत बाळू कांबळे व.व.६० रा सर्वजण राक्षी हे पाचजण या गाव मिटींगला उपस्थित नसल्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पन्हाळा पोलीस यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई व तहसीलदार माधवी शिंदे या दिवसभर घटना घडलेल्या ठिकाणी हजर होत्या.

सदर आरोपीना मा.न्यालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा आधीक तपास पन्हाळा पोलीस ठाण्याचे पि एस आय भाऊसाहेब मलुगडे हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments