Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर मध्ये बनावट माल विक्री प्रकरणी एकावर गुन्हा चार लाखाचा मुद्देमाल जप्त.

 गांधीनगर मध्ये बनावट माल विक्री प्रकरणी एकावर गुन्हा चार लाखाचा मुद्देमाल जप्त.

-------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------------------

गांधीनगर ::-झारा कंपनी उत्पादित शर्टाची हुबेहूब नक्कल करून ते गांधीनगर बाजारपेठेतील झुलेलाल मार्केटमध्ये असणाऱ्या श्रीराम क्रिएशन या दुकानात विक्रीस ठेवल्याप्रकरणी दुकान मालक सुनील किशनचंद निरंकारी रा प्रेमप्रकाश मंदिर गांधीनगर याच्यावर स्वामीत्व कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत झारा कंपनीचे अधिकारी विपिन गुलाब सिंग रा.नालासोपारा पालघर , यांनी याबाबत फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी.सुनील निरंकारी यांनी गडमुडशिंगी हद्दीत असणाऱ्या श्रीराम क्रिएशन या दुकानांमध्ये, झारा कंपनीचे, बनावट लेबल लावून,तीन लाख 85 हजार रुपये किमतीचे 700 नग विक्रीस ठेवले होते.तसेच नोव्हेल कंपनीचे मशीन,आणि झारा कंपनीचे टॅग असे मिळून 3 लाख 99 हजार रुपयेचा मुद्देमाल,जप्त करण्यात, आला असून सुनील निरंकारी याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अहवाल न्यायालयास सादर करण्याची तजवीज केली आहे.या कारवाईत प्रमोद मोकाशी, नितीन कदम, अविनाश पाटील, या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार संदीप कुंभार करत आहेत.

Post a Comment

0 Comments