Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाचे सांत्वन.

 मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाचे सांत्वन.

------------------------------

परभणी/प्रतिनिधी

------------------------------

मराठा आरक्षणासाठी काही युवकांनी आत्महत्या केली आहे. या पार्श्वभुमीवर वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दीपावलीच्या काळात त्यांना असलेल्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी शुक्रवारी (दि.10) सामाजिक भावनेतून समीर गणेशराव दुधगांवकर यांनी या कुटुुंंबाची भेट देवून सांंत्वन केले.

समीर दुधगावकर यांच्या वतीने परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंंह येथील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधव नागेश बुचाले यांच्या कुटुंबियास रोख पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल असे जाहीर केले. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा पर्याय असू शकत नाही. तरी देखील भावनेच्या भरात, नैराश्यातून मराठा आरक्षणाकरिता या दोन महिन्यात परभणी जिल्ह्यात 6 पेक्षा जास्त मराठा समाजबांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यातील बरेच कुटूंब हे अजूनही शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सर्वांना मदत करण्याचा मानस समीर यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी समीर दुधगावकर यांच्यासह किशोर रणेर, नितीन देशमुख, दादाराव काळे आदी उपस्थित होते.

[11/10, 19:33] sureshmadkar: पाथरी शहरात गांजा पकडला


पाथरी/प्रतिनिधी


 विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवून ठेवण्यात आलेला 53 हजार रूपये किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पाथरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संध्याकाळी 7 वाजण्याचा सुमारास पाथरी शहरातील फक्राबाद मोहल्ला येथे केली आहे.

शेख रशिद (फक्राबाद मोहल्ला पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. शेख रशिद याने घरात गांजा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसाना मिळाली. पोलीस अधीक्षक रागसुधा आर., अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, संदीप थोरवे, विलास थोरवे, जयश्री आव्हाड, सिध्देश्वर चाटे, मधुकर ढवळे, नामदेव दुबे, रामा पौळ, अमोल मुंडे, बालाजी लटपटे यांच्या पथकाने आरोपीच्या घरी छापा मारला. तिथे पोलिसांना गांजा साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. आरोपीविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments