सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता म्हणजे सागर सोनकांबळे सिद्राम ओहळ.
सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता म्हणजे सागर सोनकांबळे सिद्राम ओहळ.
----------------------------
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
----------------------------
ऐरोली (दिघा ):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )गटाचे नवीमुंबई दिघा विभाग अध्यक्ष श्री सागर सोनकांबळे यांचा वाढदिवस त्यांच्या निवास्थानी सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी शुभेच्छा देताना आर. पी. आय (आ )गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्राम ओहळ यांनी सागर सोनकांबळे यांना शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी जपणारा खरा कार्यकर्ता म्हणजे सागर होय,असे संबोधिले.
या वेळी शुभेच्छा देण्यासाठी सिद्राम ओहळ, युवराज मोरे,मुकेश गायकवाड, श्री. मस्के,अशोक शिनगारे, बिपीन बनसोडे,मा. नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, चंद्राम सोनकांबळे, विरेश सिंग, विभागातील जेष्ठ, विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते,आदी यांनी सागर सोनकांबळे यांना वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment