Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक 11 ते 17 डिसेंबर 2023 सिकल सेल आजार निर्मूलन अभियान सप्ताह.

 दिनांक 11 ते 17 डिसेंबर 2023 सिकल सेल आजार निर्मूलन अभियान सप्ताह.


-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
रिसोड प्रतिनिधी 
रणजित ठाकुर 

-----------------------------------------

 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनोजा येथे सिकलसेल शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एकूण 104 विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली व सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सिकलसेल हा आजार आनुवंशिक आहे.तसेच 1 ते 40 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांनी आपली सिकल सेल तपासणी करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बेले सर यांनी केले. सिकलसेल आजारामधे पेशंट व्यक्तींनी घ्यावयाची काळजी त्यांना मिळणारा मासिक 1 हजार रुपये मोबदला.व मोफत प्रवास,सिकल सेल आजाराचे लक्षणे व उपचार या बाबद श्री भारत पारवे तालुका सिकलसेल सहाय्यक यांनी माहिती दिली.सोबत श्री. संजय देशमुख पोलीस पाटील,मुख्याध्यापक श्री.सराफ सर , श्रीमती. धोंगडे सिस्टर आरोग्य सेविका, श्री.गायकवाड आरोग्य सेवक , आशा स्वयसेविका व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments