विकसित भारत संकल्प यात्रा अभियानामध्ये विविध योजनेचा 13086 लाभार्थ्यांना लाभ.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानामध्ये विविध योजनेचा 13086 लाभार्थ्यांना लाभ.
--------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी
रजनी कुंभार
--------------------------------------
संकल्प यात्रेच्या ठिकाणी 9 दिवसात 20300 नागरीकांची भेट.
कोल्हापूर, दि.18 : केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने ज्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने शासन स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक प्रक्रियेत आणण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे शासनाच्या विविध योजना स्क्रिनवर दाखविण्यात येत आहेत.
या मोहिमेअंतर्गत दि.9 ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत ही संकल्प यात्रा कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत 9 दिवसात केंद्र शासनाच्या विविध योजनेसाठी 13086 लाभार्थ्यांनी संकल्प यात्रेद्वारे विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 812, पी.एम.स्वनिधीसाठी 1139, आयुष्यामान भारत कार्डसाठी 2221, उज्वला योजना 329, संकल्प योजना 1905, आधारकार्ड 549, मेरी कहानी योजनेअंतर्गत 170 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. तर आरोग्य विभागाच्या हेल्थ कॅम्पमध्ये 5961 नागरीकांनी आपली तपासणी करुन घेतली आहे. या संकल्प यात्रेच्या ठिकाणी आजअखेर 20300 नागरीकांनी बूथवर भेट दिलेली आहे.
या संकल्प यात्रेचा शहरात मंगळवार, दि.19 डिसेंबर 2023 रोजी शेवटचा दिवस असून हुतात्मा पार्क चौक व उद्यमनगर याठिकाणी हि संकल्प यात्रा घेण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment