Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माचीस न दिल्यामुळे केला खून.

 माचीस न दिल्यामुळे  केला खून.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुंबई प्रतिनिधी

रवी ढवळे 

-----------------------------------

पोलिसानी केला खूनाचा उलगडा... एकास अटक

नवी मुंबई (तुर्भे ):- अज्ञात व्यक्तीकडे माचीस मागून त्याने न दिल्याने झालेल्या वादातून दगड डोक्यात घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली

या खूनाच्या घटनेचा उलगडा तुर्भे एमआयडीसी पोलिसानी केला याप्रकरणी नहिम अन्सारी याला अटक केली असून, तो इंदिरानगर परिसरात राहणारा आहे. बेवारस आढलेले मृतदेहावरून पोलिसानी कौशल्यपूर्ण तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.इंदिरानगर परिसरात रस्त्यालगत एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी नागरिकांना आढळून आली होती. परिसरातील नागरिक कडून तुर्भे एमआयडीसी पोलिसांना त्याची दिली माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी जखमीला  रुग्णालयात दाखल  केले. मात्र डॉक्टरानी त्यांस मृत घोषित केले. त्यांच्या डोक्यावर दगडाने गंभीर घाव घालून हत्या करण्यात आली होती. तर घाव इतके जोरदार होते कि त्यांची कवटी फुटली होती.


नहिम अन्सारी (23)असे मारेकऱ्याच नाव असून, मृत व्यक्तीचे नाव प्रसाद खडका असे आहे.या गुन्हाची तपासणी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दोडकर व त्यांची टीम आधीक चौकशी करत असताना सदर आरोपीने खून केल्याची कबुली दिली.

Post a Comment

0 Comments