राज्यातील सर्व ग्रामपंचायतची काम तीन दिवस बंद राहणार.

 राज्यातील सर्व ग्रामपंचायतची काम तीन दिवस बंद राहणार.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी

चंद्रशेखर जाधव 

------------------------------------------

राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तीन दिवस संपावर जाणार.

मेढा. -- राज्या शासनाकडे ग्रामपंचायत  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून

महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5139 च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या जसे की,

1) मा.अभयावलकर समितीची शिफारस स्वीकारून ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगरपरिषद नगरपंचायत यांच्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करणे

2) भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी संघटन या कार्यालयाकडे जमा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे

3) जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार च्या पदाची आरक्षण मर्यादा 20 टक्के करणे

4) जिल्हा परिषदेकडे मेगा भरती साठी रिक्त असलेली वर्ग 4 ची पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरणे साठी तात्काळ मंजुरी देणे

5) कलम 61 रद्द करणे

6) ग्रामपंचायत कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन लागू होणे बाबत

7) आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केस करणे

या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले असून तशा प्रकारची निवेदन जिल्हा परिषद कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांना सादर करण्यात आलेली आहेत 

ग्रामपंचायत विविध घटकांनी एकत्र येऊन आपापल्या मागणीसाठी हा लढा उभा केला असून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सदरचे आंदोलन करण्याचे ठरविले असून सरपंच उपसरपंच यांच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ व्हावी ग्रामपंचायत सदस्यांना भत्ता मिळावा संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारीचा दर्जा मिळावा ग्राम रोजगार सेवक यांना अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नेमणूक करून मानधन मिळावे यासाठी राज्यातील सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी परिचारक व ग्रामरोजगार सेवक हे सर्व मिळून 18 डिसेंबर 2023 20 डिसेंबर 2023 या तीन दिवसासाठी ग्रामपंचायतचे कामकाज बंद ठेवणार आहे

अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5139 चे अध्यक्ष पंढरीनाथ मर्ढेकर यांनी दिली यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष रमेश भोसले  जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर कोळी महिला उपाध्यक्ष मीना कदम संतोष पंडित अजय वाघ, जावली तालुका अध्यक्ष दीपक पवार उपाध्यक्ष शैलेश पार्टे सचिव गुरुदत्त पार्टे व मार्गदर्शक रवींद्र हिरवे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.