Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मेढा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

 मेढा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

---------------------------------

फ्रंटलाइन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधि

 शेखर जाधव

---------------------------------

भणंग प्रतिनिधी :- मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मिडिया पत्रकार परिषदेने आयोजीत केलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिर जावळीची राजधानी मेढा येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात संपन्न झाले मेढा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वाळुंजकर यांनी या कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले होते.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बंधूचा ग्रामीण रुग्नालय तर्फ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला 

आरोग्य तपासणी शिबिर दरम्यान मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तगट तपासणी इ सी जी तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर वाळुंजकर म्हणाले आमचे कडे सिरियस पेशंट असेल तरच सातारा रुग्नालयात पाठवतो त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये तसेच आमच्या रुग्नालयातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेबाबतची माहीती वर्तमान पत्राद्वारे पत्रकारांनी लोकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती आहे पत्रकारांनी दाखवलेत्या चुकांमुळे आम्हाला योग्य प्रकारे कामकाज करता येते असेही त्यांनी यावेळी सांगीतले या कार्यक्रमामध्ये जावली तालुका डिजीटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भास्कर धनावडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जावली तालुका अध्यक्ष- सत्य सह्याद्री दैनिकाचे पत्रकार सुनिल धनावडे , जेष्ठ पत्रकार / चित्रकार मोहन जगताप , मराठा महासंघाचे जावली तालुका सोशल मिडीया अध्यक्ष - दै सत्य सहयाद्रीचे पत्रकार संजय वांगडे , बजरंग चौधरी , विश्वनाथ डिगे , सूर्यकांत पवार , संजय दळवी , विजय सपकाळ , रघुनाथ पार्टे , संतोष बेलोशे तसेच इतर पत्रकारांनी आरोग्य तपासणी करून घेतली. 

मेढा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वाळुंजकर , डॉ.नाईक , डॉ. हिरवे , डॉ लावंड , डॉ. मधुरा चव्हाण ,अधिपरीचारीका नलवडे मॅडम औषध निर्माण अधिकारी शैलेंद्र गायकवाड , अधिपरिचारीका सावंत मॅडम,समुपदेशकचे रवि माने , शितल सुतार मॅडम ,नावडकर मॅडम , श्री करंजेकर , सौरभ शेलार , सिमा कांबळे , यांचा जावली तालुका पत्रकार संघ ,जावली तालुका डिजीटल मिडीया संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments