Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या पेन्शन ची मागणी संघटनांनी लावून धरावी.

 जुन्या पेन्शन ची मागणी संघटनांनी लावून धरावी.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

-------------------------------------

महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत नाही

बाळासाहेब आंबेडकर यांची रिसोड येथे पत्रकार परिषद रणजित ठाकूर .प्रतिनिधी. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विदर्भातील विविध संघटनांनी अनेक प्रश्नाबाबत आवाज उठवला होता. त्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्यांचा विशेष मुद्दा होता. परंतु सत्ताधाऱ्यांनी या सर्व प्रश्नांना बगल देत, केवळ कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनबाबत थातूरमातूर चर्चा केली. या सर्व घडामोडीवर विरोधी पक्ष पाहिजे तेवढा आक्रमक होताना दिसला नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता दुष्काळी परिस्थिती बाबत राज्य सरकार उदासीन तर विरोधी पक्ष असं अस्तित्वहीन असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले आहे.सोबतच सत्ताधारी व विरोधीकांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील केला आहे. 

     प्रकाश आंबेडकर यांनी वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव, वेगळा विदर्भ, पिकविमा, दुष्काळी परिस्थिती आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आदी मुद्द्यांना हात घालत, याबाबत राज्य सरकारकडे कुठलेही विशेष ध्येयधोरण नसल्याचे नमूद केले आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष सरकारला कुठल्याही ठोस मुद्द्यावर कोंडीत पकडण्यात सपशेल अपयशी ठरले असून, राज्यातील विरोधी पक्षच अस्तित्वहीन असल्याची प्रखर टीका देखील त्यांनी केली आहे. विरोधकांच्या एकंदरीत हालचालीवरून सत्ताधारी व विरोधक यांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावून घेण्याची हीच योग्य वेळ असून, त्याबाबत संबंधित संघटनांनी आक्रमकपणे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे. 

    कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून घ्यायची असेल, तर दगडाखालचा हात काढून घ्यायची हीच योग्य संधी असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत बोलताना ते म्हणाले, पीक विम्याची अग्रमी रक्कम मंजूर केल्याची घोषणा केली. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात सदर रक्कम अद्याप पर्यंत जमा झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना अजून पर्यंत पिक विमा ची रक्कम मिळालीच नाही हे वास्तव आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी पोटतिडकेने करत आहेत. परंतु याबाबत राज्य सरकार उदासीन असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. तर विरोधी पक्ष फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. यावरून सत्ताधारी व विरोधी यांची मिली भगत असल्याचे जाणवते. अशी टीका यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड. आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत महीला राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर, पश्चिम विदर्भ प्रमुख डॉक्टर सिद्धार्थ देवळे अरूंधती सिरसाट, किरणताई गिऱ्हे, ज्योतीताई इंगळे, सोनाजी इंगळे, अनिल गरकळ, सय्यद अकील मनोज देशमुख आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments