Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भरधाव ट्रक च्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

 भरधाव ट्रक च्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

शिरोली नागाव प्रतिनिधी

अमित खांडेकर 

-------------------------------

पुणे  – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. हा अपघात शिये फाटा येथे धनराज हॉटेलसमोर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास झाला.  


या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय ४७ रा. वारणा कोडोली ता पन्हाळा ) असे असून सतिश हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स कंपनीत कामास होता. तो  सकाळी शिये फाटा येथे आपल्या मोटरसायकलने जात असता धनराज हॉटेलसमोर आला . दरम्यान पुणेहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातामुळे हायवेवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती.

या अपघाताची नोंद शिरोली एम आयडीसी पोलिसात झाली आहे.

Post a Comment

0 Comments