आगामी विधानसभेच्या तयारीला लागा;- के पी पाटील .
आगामी विधानसभेच्या तयारीला लागा;- के पी पाटील.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील सर्व मतदारांनी , कार्यकर्ते व जनतेने कामाला लागा, पुढचा आमदार मीच असणार आहे. असे प्रतिपादन बिद्री कारखान्याचे नूतन चेअरमन के पी पाटील यांनी केले, ते राधानगरी येथे आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यानी व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय गोजारे यांनी केले
यावेळी बोलताना के पी पाटील म्हणाले की,17 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अडचणींना सामोरे जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सभासदांना राज्यात 3407 रुपये दर देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. आगामी काळात को जनरेशन काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.सभासदांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थक करू अशी ग्वाही दिली. तसेच बिद्री कारखाना स्थापनेपासून राधानगरीचा संचालक कधी झाला नाही. मात्र युवा नेते राजेंद्र भाटळे यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राधानगरी तालुक्यातून बळ मिळाले आहे. म्हणुन येणाऱ्या निवडणूकित सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. यावेळी नूतन संचालक राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, उमेश भोईटे व अन्य संचालकांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
के पी पाटील म्हणाले की,राधानगरी तालुक्यातील जनतेला माझे आवाहन आहे की तालुक्यातील सर्व टोलनाके मी बंद केले असून कोणतेही काम असल्यास निःसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधा,असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना केला.
यावेळी सरपंच सविता भाटळे, उपसरपंच अरुणा पोवार, प्रा, बी डी चौगले, सुहास म्हापसेकर, प्रकाश कोगेकर, अनुपम वागरे, डॉक्टर व्ही. बी सरावणे, मारुती पाटील, मंगेश राऊत, अजिंक्य वाडकर ,तुषार पाटील, विकास पाटील, राजेंद्र म्हापसेकर,डी. एस .कांबळे यांच्यासह ग्रा पं सदस्य व ऊस उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते, आभार बाळासाहेब कळमकर यांनी मानले
Comments
Post a Comment