Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर मध्ये भाजप महिला मोर्चा आंदोलन.

 गांधीनगर मध्ये भाजप महिला मोर्चा आंदोलन.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

ओडिसा मधील काँग्रेसचे  राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या कोट्यावधी रकमेच्या   विरोधात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी  गांधीनगर इथं महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका  महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा मारो आंदोलन केले.


ओडिसा मधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे 200 कोटीहून अधिक बेनामी रक्कम सापडलेले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारची फसवणूक केलेली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.  त्याचाच एक भाग म्हणून भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या गणेश चित्रमंदिर नजीक जोरदार निदर्शने करण्यात आली.  यावेळी काँग्रेस हटाव गरीब बचाव, काँग्रेस गोलमाल गरीब हाल हाल,मळलेला हात करतो जनतेचा घात,काँग्रेसचा हात पोटावर लाथ,कॅश की कोठरी पाप की गठरी, मोहब्बत की दुकान चोरी का सामान अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला.  त्यानंतर काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारो आंदोलन करण्यात आले.दक्षिण विधानसभा प्रमुख सुलोचना नार्वेकर  पूनम परमानंदानी, प्रतिभा जाधव,रितू लालवानी, अनिता पाटील  वंदना कांबळे,सरिता सुतार,अंजना,मेघा मोहीते ,राधिका मोरे,  स्वाती इंगवले, लक्ष्मी धामेजा सरिता कटेजा, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष  अनिल पंढरे, सरपंच संदिप पाटोळे, गजेंद्र हेगडे ग्रा.स.उमेश पाटील,उदय पाटील, महेश मोरे, शिवाजी खांडेकर,शशी खांडेकर,दिपक पाटील, यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी आणि इ कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments