Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव पोलिसांकडून अट्टल मोबाईल चोरटा जेरबंद आरोपीकडून जप्त केले तब्बल १७ मोबाईल हँडसेट.

 बोरगाव पोलिसांकडून अट्टल मोबाईल चोरटा जेरबंद आरोपीकडून जप्त केले तब्बल १७ मोबाईल हँडसेट.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर

------------------------------

        श्री. समीर शेख मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, तसेच श्री. किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी रेकॉर्डवरील मालाविरुद्ध दाखल गुन्ह्याची उकल करणेबाबत सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने बोरगाव *पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. रविंद्र तेलतुंबडे* यांनी बोरगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अभिलेखावरील मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करीत असताना त्यांना बोरगाव पोलीस स्टेशन अभिलेखावर दाखल असलेल्या गु.र.नं. ५३३/२०२३ भा. द.वि. स.कलम ३७९ प्रमाणे माजगांव ता.जि.सातारा.येथील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ओंकार शिवाजी फडतरे वय २२ वर्षे हल्ली रा. कारंडवाडी ता.जि सातारा मूळ रा.अपशिंगे ता.जि. सातारा याचा सहभाग निष्पन्न होत असून सदर आरोपीने अन्य ठिकाणहून बरेचसे मोबाईल हँडसेट चोरले असल्याचे समजले. त्याच्याबाबत गोपनीय बातमीदाराकरावी माहिती काढली असता ओंकार फडतरे हा माजगांव येथून चोरलेला मोबाईल व त्याने इतर ठिकाणावरून चोरलेले मोबाईल विक्रीसाठी म्हणून त्याच्या काळ्या रंगाच्या ॲक्टिवा स्कुटी क्र. एम एच- 11.D.G 7266 वरून अपशिंगे हून नागठाणे गावी घेऊन जाणार असल्याचे व त्याने अंगात लाल रंगाचे जर्किन व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली असल्याचे समजले या अनुषंगाने बोरगाव पोलिसांनी बोरगांव गावाजवळ सापळा रुचून ओंकार फडतरे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे बुद्धीकौशल्याने तपास केला असता त्याच्याकडून माजगांव येथून चोरलेला मोबाईल हँडसेट मिळाला तसेच त्याने मागील सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून चोरलेले तब्बल १६ मोबाईल हँडसेटदेखील स्कुटीच्या डिग्गीत मिळाले. पोलिसांनी ओंकार फडतरे याच्याकडून एकत्रित १,८४,००० /- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हँडसेट व तो मोबाईल हँडसेट विक्रीसाठी घेवून जात असताना कब्जात मिळून आलेली ९०००० /- रुपये किंमतीची स्कुटी असा एकूण २,७४,००० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

         सदरची कारवाई ही श्री. *समीर शेख मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, तसेच श्री. किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांच्या सूचनेप्रमाणे व सपोनि श्री. रवींद्र तैलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बोरगांव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमोल सपकाळ, दादा स्वामी, पोलीस नाईक दीपक कुमार मांडवे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, केतन जाधव व बाळासाहेब जानकर हे सहभागी झाले होते.* सदर गुन्ह्याचा *अधिक तपास पोलिस हवालदार अमोल सपकाळ हे करीत आहेत.*

Post a Comment

0 Comments