Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ऍड,बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रिसोड विधानसभा मतदान संघात वंचितचा कार्यकर्ता मेळावा.

 ऍड,बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात रिसोड विधानसभा मतदान संघात वंचितचा कार्यकर्ता मेळावा.

-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

-------------------------------------

 गजानन बाजड/ रिसोड तालुका प्रतिनिधी केशवनगर येथे वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्या साठी प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड,बाळासाहेब आंबेडकर यांनी मेळाव्याला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थितीत सन्माननीय राष्ट्रीय नेत्या प्रा अंजलीताई आंबेडकर, अरुंधतीताई शिरसाठ वाशिम जिल्हा प्रभारी, डॉ सिद्धार्थ देवळे पश्चिम विदर्भ अध्यक्ष, डॉ गजाला खान प्रदेश उपाध्यक्ष, किरणताई गिऱ्हे जिल्हाध्यक्ष, सोनाजी इंगळे सर जिल्हामहासचिव ज्योतीताई इंगळे म आ जिल्हाध्यक्ष, अनिलभाऊ गरकळ युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, हे होते. मेळाव्याला मार्गदर्शन करतांना वंचित बहुजन आघाडी घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी प्रत्येक बुथ बांधणे आवश्यक आहे. त्याशिवाय सत्ता मिळू शकत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत पुढे बोलतांना ऍड बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती ही संकल्पना शासन हळूहळू मोडीत काढत असून खाजगी व्यापाऱ्याला पाठीशी घालत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांचा शेतमाल हा शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विकला गेला पाहिजे. त्याच बरोबर शासनाने हमीभाव ठरवून दिल्याप्रमाणे तो खरेदी केला पाहिजे आणि जो कोणी हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल विकत घेईल त्या व्यापाऱ्याला व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सह सर्व संचालकांना कमीतकमी5 वर्षाची शिक्षेची तरतूद केली पाहिजे. आमचे सरकार आल्यास संपुर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक हिताच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाचा बाबतीत बोलरणा पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगार यांना कायम करून 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मानस असून सर्वांना जुनी पेन्शन दिली जाईल असे ठणकावून सांगितले. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना कायम करून त्यांना शासनाच्या सेवेतील 3 व 4 प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना संप करण्याचीच वेळ येणार नाही याची ग्वाही दिली. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसविणे आवश्यक आहे. आदिवासी पट्यातील महिला कामगारांना 45 सेल्सिअस उन्हाच्या काळात बाहेर बसून बिबे फोडावे लागतात त्यांना प्रत्येक गावात क्षमतेनुसार सिमेंटचे सेड बांधून देण्याचे आश्वासन दिले. आरक्षणाच्या बाबतीत शासन निरुत्साही असून obc आरक्षणाला धक्का न लागता मराठा आणि इतर तत्सम जातींना वेगळे अरक्षा देण्याचा आमच्याकडे फार्मूला असून शेतकरी, कर्मचारी, व सर्व सामान्य मजूर यांना न्याय देण्यासाठी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष सध्यातरी सत्तेत मसविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जाती धर्मातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करून येणाऱ्या 2024 च्या सर्व निवडणुकीत तन, मन, धनाने सहकार्य करून सत्ता आपल्या हाती घेऊया असे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीची ठाम आणि योग्य भूमिका असल्यानेच रिसोड , वाशिम, कारंजा विधानसभा क्षेत्रातील अनेक वंचित घटकातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किरणताई गिरे या होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतीताई इंगळे महिला आघाडी यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाजी इंगळे सर महासचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट हिरामण मोरे यांनी मानले यावेळी कार्यक्रमासाठी अनिल भाऊ गरकळ जिल्हाध्यक्ष युवा आघाडी, जिल्हा सचिव उत्तमराव झगडे महिला आघाडी महाडाचीव प्रतिभा अंभोरे, सुशीला खाडे, तालुका अध्यक्ष वंदना गायकवाड, अंभोरे, सौरभ सपकाळ जिल्हा महासचिव युवा आघाडी, प्रा रंगनाथ धांडे सर जिल्हा उपाध्यक्ष, कारंजा विधानसभा समन्वयक इंजि अभिजित राठोड , संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संदिपभाऊ सावळे, दत्तराव गोटे, सुभाष राठोड , जिल्हा सचिव वसंता हिवराळे, सय्यद अकिलभाई रिसोड तालुका अध्यक्ष, मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार, ता महासचिव राजू जमधाडे, ता उपाध्यक्ष कैलास ढाले, नागेश पाटील कारंजा तालुका अध्यक्ष, रविभाऊ तिडके तालुका महासचिव, गोपाल पारिसकर युवा तालुका अध्यक्ष सदानंद गायकवाड युवा शहराध्यक्ष रिसोड सागर इंगळे शहर अध्यक्ष वाशिम, तसेच संपूर्ण जिल्हा पदाधिकारी वाशिम, सर्व तालुका पदाधिकारी यांचेसह हजारोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेबांना मानणारे सर्व हितचिंतक प्रचंड असा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments