Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूडमधे जांभूळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार बंदोबस्ताची मागणी.

 मुरगूडमधे जांभूळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार बंदोबस्ताची मागणी.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनीधी 

 जोतीराम कुंभार

--------------------------------

  मुरगुडमधे जवळच असलेल्या जांभुळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार वाढला असून या परिसरातील शेती पीकांचे नुकसान होत आहे . वन विभागाने या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .

         जांभूळखोरा -अवचितवाडी परिसरात गवा रेडयांचा कळप आढळून येत आहे . यधील शेतकरी समीर गोरुले यांना मंगळवारी दुपारी गवा रेड्यांचा कळप दिसून आला . यासंबधी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविले आहे .

        जांभूळ खोऱ्यातील सदाशिव मेंडके ' संतोष मेंडके , भैरू इंदलकर . तानाजी मसवेकर आदि शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व ज्वारी पीकांची मोठया प्रमाणात नासधूस गवा रेडयांकडून झाली आहे . या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी . अशी मागणी होत आहे .

 १ )मुरगूडच्या जांभूळ खोऱ्यात मुक्त संचार करणारे गवा रेडे

  २ ) गवा रेडयांच्यामूळे झालेले शेती पीकाचे नुकसान .

Post a Comment

0 Comments