Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथे वधु-वरांच्या हस्ते बेल वृक्षारोपणं कार्यक्रम.

 रिसोड येथे वधु-वरांच्या हस्ते बेल वृक्षारोपणं कार्यक्रम.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीतसिंग ठाकूर

-------------------------------

 लग्न सोहळा हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा सामाजिक व धार्मिक संस्कार आहे. ह्या कार्यामधुन मानवी जीवनाला एक आगळी वेगळी अविस्मरणीय कलाटणी मिळते असे म्हणणे वावगे होणार नाही.लग्न सोहळ्या दरम्यान पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरा म्हणजे त्या काळानुसार निर्माण झालेल्या अत्यावश्यक पुरक घटना होतं यात तीळमात्र शंका नाही. जर सद्यस्थितीचा विचार केला तर लग्न सोहळ्या दरम्यान पर्यावरणंपुरक नविन पायंडा पाडून स्वच्छ पर्यावरणं निर्माण करणे ही काळाची गरज आहे,असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन महादेव आप्पा मुलंगे ह्यांनी व्यक्त केले.ते नवनिर्मित मुक्तेश्वर संस्थान परिसर रिसोड येथे वर चि.शुभम मुलंगे व वधु. चि.सौ.कां.सोनाली भवानकर या नव दांपत्याच्या हस्ते बेलवृक्षारोपणं कार्यक्रमाच्या संदर्भात बोलत होते. कार्यक्रमाकरिता ऍडव्होकेट प्रशांत माझोडकर अध्यक्ष श्री संत अमरदास बाबा संस्थान रिसोड,सदस्य अनिल धामणकर,निर्जला दिघोळे वनपाल सामाजिक वनीकरण विभाग रिसोड,सौ. सिमा डांगे न.प. सदस्या रिसोड,वृक्षप्रेमी सौ.दिपाली भोगावकर,श्रीमती शारदा पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे महत्व विशद करतांना मुलंगे पुढे म्हणाले कि, जनहितार्थ दृष्टीकोन व सजिव सृष्टीला पोषक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक नव दांपत्याने कमीत-कमी कोणत्याही एका देशी वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन करावे. ऐव्हाणा लग्न सोहळ्यामध्ये वर - वधू पक्षाच्या मंडळीकडून हौसेखातर अनेक आवश्यक व अनावश्यक बाबीवर अनाठायी खर्च केल्या जातो.वृक्षारोपनाला पण एक आवश्यक बाब समजून त्याबाबत ही अत्यल्प खर्च करावा,जेणेकरून एका विधायक व पर्यावरणपूरक संदेशाचा प्रचार व प्रसार तर होईलचं, याशिवाय स्वतःला निसर्ग ऋणामधुन मुक्त होण्याचे समाधान निश्चितच प्राप्त होईल यामध्ये दोमत नाही.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.भावना परमा,सौ. पुष्पा मुंगसे,शिवम पेठकर,ओम पेठकर, अक्षय मिटकरी,शंतनु भोगावकर ,कु. आराध्या बोधेकर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments