आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल च्या स्केटिंग खेळाडूंचे सुवर्णमय यश.
आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल च्या स्केटिंग खेळाडूंचे सुवर्णमय यश.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनीधी
जोतीराम कुंभार
---------------------------------
रुलर गेम्स स्केटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर संघटनेच्या वतीने ४ थी जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग निवड चाचणी रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी मार्केट यार्ड, स्केटिंग रिंग गडहिंग्लज येथे घेण्यात आली यामधे जय शिवराज एज्युकेशन सोसायटी मुरगुड संचलित, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, सदाशिवनगर हमिदवाडा येथील स्केटिंग खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पहिल्यांदाच स्केटिंग स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव सुवर्ण पदकांनी झणकावले. यामध्ये ८ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु.स्वरा डावरे हिने दोन सुवर्ण, ७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु.मनवा जाधव हिने एक सुवर्ण, एक रौप्य पदक व कु. शिवांगी देवडकर हिने दोन कास्य तर, ९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये कु.आरव कांबळे यांने दोन कास्य पदके मिळवली.
या सर्वांना प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. घोरपडे व सहाय्यक शिक्षका शितल खेडे यांचे प्रोत्साहन त्याचबरोबर संस्थेचे सचिव वीरेंद्रसिंह मंडलिक व कार्यवाह अण्णासो थोरवत यांची प्रेरणा मिळाली.
Comments
Post a Comment