Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निलेशा कंप्युटर्स मेढा’ दक्षिण महाराष्ट्र मध्ये अव्वल.

 निलेशा कंप्युटर्स मेढा’ दक्षिण महाराष्ट्र मध्ये अव्वल.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

शेखर जाधव

---------------------------------

मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक सोहळा, विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती.

मेढा येथील निलेशा कंप्युटर्स यांना कौशल्य आधारित कोर्सेसमध्ये शैक्षणिक वितरण प्रक्रियेसाठी सर्वोत्तम आणि अद्वितीय कामगिरी बद्दल आणि दक्षिण महाराष्ट्रामधील उत्कृष्ठ संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणून ‘एमकेसीएल’ च्या महाप्रबंधक विना कामथ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कराड येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘एमकेसीएल’ आयोजित दक्षिण महाराष्ट्र वार्षिक सोहळ्यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्यातील पाचशे पेक्षा अधिक केंद्रातून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करण्यासाठी युवा भारत सक्षम करण्यासाठी शासकीय नोकरीसाठी आवश्यक ‘एमएस – सीआयटी’ सोबत ‘टॅली ९.०’ आणि ‘प्राईम’, ‘अडव्हांसड एक्सेल’, ‘स्पोकन इंग्लिश’, ‘फोटोशॉप’ व ‘व्हिडिओ एडिटिंग’, ‘प्रोग्रामिंग लँग्वेजेस’मध्ये सी, सी++, जावा, पायथॅान सारखे अत्याधुनिक कोर्सेस अत्यंत माफक फी मध्ये तज्ञ मार्गदर्शकांकडून शिकविले जातात. या बरोबरच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासअंतर्गत मोफत कोर्सेस आणि सारथी संस्थेचा सहा महिन्यांचा डिप्लोमा कोर्स प्रभावीपणे घेतले जातात. 

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण शैक्षणिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विकास करण्याचा ध्यास निलेशा कंप्युटर्सने स्थापनेपासूनच घेतला आहे. त्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे प्रशिक्षक, विविध जॉब ओरिएंटेड कोर्सेस, मान्यवरांचे मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करून भरपूर सरावासह करिअरच्या वाटांची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळेच या परिसरातील मुले-मुली पुण्या-मुंबईतील युवकांबरोबर स्पर्धा करण्यास सक्षम बनत आहेत. अल्पावधीतच विद्यार्थ्यांसह पालकांच्या पसंतीस उतरलेले जावली तालुक्यातील अत्याधुनिक सर्व सोयींनीयुक्त शासनमान्य संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणजेच निलेशा कंप्युटर्स अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यामागे मुलांना घडविणे ही एकच प्रेरणा संस्थाचालक श्री. निलेश धनावडे आणि त्यांच्या पत्नी सौ. अधिका धनावडे यांची आहे.

सदर कार्यक्रमास ‘एमकेसीएल’च्या महाप्रबंधक विना कामथ, जनरल मॅनेजर अतुल पतौडी, अमित रानडे, विवेक देसाई, उपमहाप्रबंधक डॉ. दिपक पाटेकर, विभागीय समन्वयक श्री. अनिल गावंडे, प्रादेशिक व्यवस्थापक श्री. निखील शिलेदार, जिल्हा समन्वयक श्री. विक्रम जाधव, श्री. पराग पालवे श्री. अमोल पाटील, श्री. निखील कदम यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच झाला.

      ----------------------***-----------------------------

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणाऱ्या बदलास समोर ठेवून येणाऱ्या काळात कौशल्य आणि कार्यबल विकास शिक्षणावर महाराष्ट्र ज्ञान महा मंडळाचा जास्तीतजास्त भर असणार आहे. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

- वीणा कामथ, महाप्रबंधक एमकेसीएलएमकेसीएलच्या कार्यक्रमात निलेशा कंप्युटर्स चे निलेश धनावडे यांना सन्मानपत्र प्रदान करताना मध्यभागी वीणा कामथ, अतुल पतौडी, अमित रानडे, विवेक देसाई, डावीकडे अनिल गावंडे, डॉ. दिपक पाटेकर, निखिल शिलेदार आणि विक्रम जाधव.

--------------------***----------------------

Post a Comment

0 Comments