Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

 कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी 

वैभव शिंदे 

----------------------------------------

 पोलीस ठाणे रेकॉर्डवरील खुनाचा प्रयत्न करणारे सराईत गुंडास अटक.

     दिनांक 15/12/2023 कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परिसरात राहणारा सराईत गुंड सोमनाथ सूर्यवंशी व त्याचे साथीदार रविराज पळसे व आर्यन सूर्यवंशी यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे अभिषेक कोरडे यांना देवीची वर्गणी दिली नाही या कारणावरून धारदार कोयत्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून यातील तिन्ही आरोपी हे फरार झाले होते.

        सदर आरोपी यांचे बाबत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड यांना मिळाली. बातमीच्या आधारावरून व तांत्रिक माहिती वरून आरोपीचे ठावठिकाणाची माहिती मिळालेली कराड शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड यांच्या संयुक्त पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदरचा आरोपी सोमा सूर्यवंशी याचे वर कराड शहर पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाणे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

         सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो. सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकूर सो. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे सो, सफौ संजय देवकुळे, पो.हवा. प्रवीण पवार पो.ना सागर बर्गे, पो.ना. दीपक कोळी, पो.हवा शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, महेश शिंदे यांनी केलेली आहे

Post a Comment

0 Comments