Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन महाविद्यालयात भाषा उत्सव साजरा.

 किसन महाविद्यालयात भाषा उत्सव साजरा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

-------------------------------

वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी विभाग आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा उत्सव दिनाच्या निमित्ताने भित्तिपत्रकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची माहिती वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील स्वगत, हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी राजभाषा हिंदी, हिंदी भाषा आणि बोली, विज्ञापन आणि हिंदी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची माहिती, संस्कृत भाषेतील विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील काही वेचे व सुभाषिते तसेच इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी भारतातील इंग्रजी भाषेचे महत्त्व, मराठीतील दुनियादारी या चित्रपटाविषयी इंग्रजी मधून माहिती व जिगर मुरादाबादी यांचा सुप्रसिद्ध उर्दू शेर यांचा इंग्रजी व हिंदी अनुवाद इ. विषयावर भितीपत्रके प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील पाली व संस्कृत भाषांचे विभागप्रमुख प्रा. डॉ. महेश देवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक सुरेश यादव खजिनदार प्रा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, विश्वकोश निर्मिती कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज व संतोष गेडाम इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील सावंत हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भानुदास आगेडकर मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे संस्कृत विभागप्रमुख दीक्षा मोरे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे ग्रंथालय व अंतर्गत दर्जा हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय भाषांचा उत्सव सर्वांनी मोठ्या प्रमाणात साजरा करावा हा प्रदर्शनामागील हेतू होता. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषेतील कवितांचे सादरीकरण केले. प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments