Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा.

 राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

---------------------------------

 किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका

नाडीयाद, गुजरात येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत अनिकेत महेंद्र गावडे (१२ वी कला) याने इंडीयन आर्चरी क्रीडा प्रकारात ओहरऑल सुवर्ण, सांघिक - सुवर्ण, ३० मीटर मध्ये - सुवर्ण व ५० मीटरमध्ये कास्यपदक मिळविले तसेच ज्ञानेश्वरी दत्तात्रय देसाई (११ वी विज्ञान) हिने सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले  व कार्तिकी ज्ञानेश्वर गायकवाड (११ वी विज्ञान) हिने या स्पधैत उत्कृष्ट कामगिरी केली.

या खेळाडूंना श्री. जाधव मदन, श्री. चव्हाण सचिन व श्री. प्रणित सुतार सर यांनी मार्गदर्शन केले .

या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी ,खजिनदार प्रा. नारायण चौधरी, विश्वस्त मंडळ सदस्य, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे,  कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. विवेक सुपेकर , पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक श्री. चव्हाण श्री. जाधव यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments