Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दगंल काबू वर रंगीत तालीम.

 दगंल काबू वर रंगीत तालीम.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

---------------------------------

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिरोली एमआयडीसी गोकुळ शिरगाव व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर हद्दीतील शिवाजी चौक उंचगाव येथे दंगल काबू वर रंगीत तालीम राबवण्यात आली. 

यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी व गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्यासह 28 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments