लायसन भाडे तत्वाचे आमिश दाखवून बेरोजगार मासवर्गींयाना गंडा घालणाऱ्या शिध्दराज बार व परमिट रूम चे लायसन रद्द करा-सतिश माळगे.

लायसन भाडे तत्वाचे आमिश दाखवून बेरोजगार मासवर्गींयाना गंडा घालणाऱ्या शिध्दराज बार व परमिट रूम चे लायसन रद्द करा-सतिश माळगे.

--------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

--------------------------------

राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालय कोल्हापुर येथे आज दि.४ रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडिया(आठवले)पक्षा च्या वतिने रिपब्लीकन पक्षाचे जिल्हा सचिव सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली अतितिव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भातील माहिती पुढील कळे.ता.पन्हाळा,येथील गट नं.१०७१ मधील ग्रामपंचायत मिळकत नं.१३६४ मधील हॅाटेल सिध्दराज बिअर बार व परमिट रूमचे परवाना क्र.एफ एल-३ नं.९४३/२०१८-१९ मालक शांताबाई आनंदराव चौगुले व त्यांचा मुलगा संदिप आनंदराव चौगुले हे शासनाकडून त्यांचे उदरनिर्वाहाकरीता प्राप्त झालेले बार व परमिट रुम लायसन्स हे स्वता च्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे आहे किंवा ते लायसंन्स कोनाला ही भाडे तत्वावरती द्यायचे नाही अशी शासनाची अट्ट असताना शासनाच्या परवानगीशिवाय भाड्याने देणेच्या नावाखाली मासवर्गीय समाजातील बेरोजगार व्यावसाय इच्छुक लोकांना लाखोंचा गंडा घालत आहेत बिअर बार व परमिट रुम भाड्याने देणेच्या आडून मागासवर्गीय समाजातील इच्छुक लोकांना हेरून त्यांच्याकडून डिपॅाझीट च्या बहाण्याने लाखो रुपये उकळून ११ महिण्याचा करार करायचा आणी मुदतिपूर्वी या ना त्या कारणावरून भाडेकरूंशी भांडण करायचे व त्यांना पिटाळून लावायचे आणी मालमत्तेत अनेक प्रकारच्या दुरूस्त्या दाखवत डिपॅाझीट गिळंकृत कारायचे आसे शांताबाई चौगुले तसेच संदीप चौगुले नामक माय लेकाच्या जोडगोळीकडून सुरू आहे.

यामुळे आनेक बेरोजगार मागासवर्गीयांची फसवणूक झाली आहे यासंदर्भात झालेल्या आंदोलनात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार घोषनाबाजी करण्यात आली आंदोलनाची तिव्रता पाहून अधिक्षक रविंद्र आवळे यांनी चौकशी अहवाल मागवून घेवून कारवाई करण्यास लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन थांबवताना दहा दिवसाच्या आत सिध्दराज बार आणी परमिट रुम चे लायसन रद्द न केल्यास जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पक्षाच्या महिला अघाडीच्या नेत्या रुपाताई वायदंडे यांनी दिला.सदर चे आंदोलन हे रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा.शहाजी कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

*याआंदोलना मध्ये अक्षय साळवे,प्रदिप ढाले,खंडेराव कुरणे,संबोधी कांबळे,सलमान मोलवी,अमर दाबाडे,बाळासो कांबळे,प्रताप बाबर,गणेश माळगे,रनजीत हाळदीकर,वैभव सुतार,अमर तांदळे,कुनाल जगदने,संजय चव्हान,केदार बांदिवडेकप,आनंद भामटेकर,बाबासो धनगर,बटू भामटेकर,सर्जेराव कांबळे, सतिश जाधव,विजय सकट,पुष्पा नलवडे,रुपाली कांबळे,छाया बाबर,संगीता चव्हाण यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थीत होते.

आयुःप्रदीप ढाले.

(रिपाइं कोल्हापुर)

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.