Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

 स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

---------------------------------

डॉ भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना आपण सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतो. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मुख्य तत्वांपैकी एक आहे. यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. यासोबतच तो जीवन चक्रातूनही मुक्त राहतो. पण निर्वाण मिळवणे सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या वयाच्या ८० व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांची स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की त्यांचे बुद्ध गुरु देखील डॉ. आंबेडकरांसारखे सद्गुरु होते. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. शाळेतील कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  दीप प्रज्वलन  व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक विजय खंडारे यांनी केली कार्यक्रमाचे आयोजन वर्ग 2 री च्या विद्यार्थ्यांनी केले होते. तसेच शाळेतील विद्यार्थी देवांश देशमुख यांनी डॉ.बाबासाहेबांची वेशभूषा करून सर्वांना त्यांच्या कार्याची माहिती दिली व बाबासाहेबांच्या जीवनावर आपले विचार मांडले.यासोबतच शाळेतील शिक्षक भास्कर टापरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आपले विचार मांडून त्यांनी केलेले कार्य सांगितले. कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक विजय खंडारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments