Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत भणंग शाळेचे घवघवीत यश.

 तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत भणंग शाळेचे घवघवीत यश.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी 

चंद्रशेखर जाधव


-----------------------------------

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी भणंग शाळेच्या खेळाडूंची निवड.

   भणंग - सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती बालक्रीडा स्पर्धेत योगासन क्रीडाप्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग येथील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले.

     लहान गटात मुलांमध्ये जयद मन्सूर पठाण याने प्रथम, आर्यन धनंजय जाधव याने द्वितीय व प्रेम महेश भोसले याने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच मुलींमध्ये सिद्धी चंद्रशेखर जाधव हिने प्रथम, आर्या योगेश जाधव हिने द्वितीय तर रिद्धी चंद्रशेखर जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला.

        या सर्व खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

       या विद्यार्थ्यांना योगशिक्षक शंकर ओंबळे, डी.टी. धनावडे, अशोक लकडे,आशा साळुंखे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. 

           भणंग शाळेतील खेळाडूंनी तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी मा. संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी, भणंगचे सरपंच गणेश जगताप, उपसरपंच हाफीजा मोमीन, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा रेश्मा जाधव आदि मान्यवरांसह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भणंग,पालक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments