Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उंचगाव मधील बेकायदेशीर बांधकामावर सोमवार पासून कारवाई.

 उंचगाव मधील बेकायदेशीर बांधकामावर सोमवार पासून कारवाई.

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण.

---------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

 कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

---------------------------------

मोठमोठ्या इमारती विनापरवाना बांधून त्यामध्ये मोठ्या दिमाखात दुकान थाटणाऱ्या व्यापाऱ्यांची आता बोलती बंद होणार आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार चव्हाण व नगर रचनाकार गुलाब राव झांबरे यांनी बेकायदेशीर विनापरवाना बांधकामावर सोमवार पासून कारवाई करणार असल्याची माहिती गुरुवारी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली. तात्काळ पंचनामा करून बेकायदेशीर बाधकामधारकावर प्राधिकरण नियमानुसार कारवाई करणार असं त्यांनी सांगितले. त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम धारकांचे धाबे दणाणले आहेत .

गांधीनगर वळिवडे चिंचवाड उंचगाव गडमुडशींगी ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेकडो बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम उभी राहत आहेत. त्याबाबत आमच्या कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून

या बांधकाम धारकांवर कडक कारवाई करणार असल्याचे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार चव्हाण यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments