Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरगाव ता.कराड मधील बेकायदेशीर उत्खननाची व महसूल बुडवणाऱ्या ना पाठीशी घालणाऱ्या शिरगाव (कराड) सर्कल,तलाठी, निलंबीत करा: जिल्हा सचिव किरण बगाडे.

 शिरगाव ता.कराड मधील बेकायदेशीर उत्खननाची व महसूल बुडवणाऱ्या ना पाठीशी घालणाऱ्या शिरगाव (कराड) सर्कल,तलाठी, निलंबीत करा: जिल्हा सचिव किरण बगाडे.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जावली तालुका प्रतिनिधी

सूर्यकांत जाधव 

-----------------------------------

रीपाई(A) चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांची जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे मागणी.

सविस्तर :-मौजे शिरगाव ता. कराड मधील पिराच्या डोंगराच्या पायथ्यालगत अनधिकृत व बेकायदेशीर रित्या पाच ते सहा महिन्यापासून अनधिकृत बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे या उत्खननाला शासनाची कोणतीही परवानगी नसतानाही खुलेआम उत्खननावर कोणतीही कारवाई का केली नाही.....का कारवाई न

करण्यासाठी तहसीलदार सर्कल तलाठी यांचे सदर उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराने हात ओले केले की काय ? तसेच आज अखेर तलाठी व सर्कल यांच्या सदर काम बेकायदेशीर उत्खनन नजरेस आले नाही का..का सर्कल यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला की काय? तरी शासनाचा महसूल बुडवणाऱ्या बेकायदेशीर उत्खन करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासन एवढे मेहरबान कशासाठी? सदर बाब गंभीर असून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या उत्खनन करणाऱ्या धनदांडग्याला पाठीशी घालणाऱ्या आपल्या पदाचा गैर वापर करून कर्तव्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिरगाव सर्कल ,तलाठी , यांच्या पूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला .

 

Post a Comment

0 Comments