Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

केळघर गाव "टॅंकरमुक्त " गाव करण्यासाठी उद्योजक राजेंद्र धनावडे यांचे योगदान.

 केळघर गाव "टॅंकरमुक्त " गाव करण्यासाठी उद्योजक राजेंद्र धनावडे यांचे योगदान.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी

चंद्रशेकर जाधव 

--------------------------------

 महत्वाचे असून त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील उद्योजक व तरुणांनी आपले गावात नदी , ओढ्यांवर बंधारे बांधून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करावी असे प्रतिपादन जावलीचे तहसीलदार श्री हनुमंत कोळेकर यांनी केले . उद्योजक राजेंद्र धनावडे हे केळघर परिसरात व गावात गेल्या ६ वर्षापासून जन्मभूमीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वेण्णा नदी व ओढ्यांवर स्वखर्चाने व मित्रांचा सहकार्याने बंधारे बांधून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत . या वर्षीही ओढ्यावर ७ बंधारे घालून जवळपास १ कि.मी. क्षेत्रात पाणीसाठा केल्याची माहिती मिळताच तहसीलदार श्री हनुमंत कोळेकर यांनी बंधाऱ्यांची पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते . यावेळी राजेंद्र धनावडे, वैभव ओंबळे , माजी सरपंच रविंद्र सल्लक , शंकर बेलोशे , आनंदा भिलारे, अंकुश बेलोशे , आनंदा ओंबळे , काशिनाथ बेलोशे , सचिन बिरामणे , दिपक मोरे , जगन्नाथ पार्टे , सतिश पार्टे , अशोक चव्हाण व राजेंद्रशेठ धनावडे मित्रमंडळ मोठ्या संखेने उपस्थीत होते . श्री कोळेकर पुढे म्हणाले राजेंद्र धनावडे यांनी गेल्या सहा वर्षापासून नदी ,ओढ्यांवर स्वखर्चातुन बंधारे बांधण्याचे कार्य केले ते नक्कीच कौतुकास्पद असून त्यांचे आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रास मदतीचे कार्य ही उल्लेनिय आहे . त्यांचा आदर्श परिसरातील तरुणांनी व उद्योजकांनी घ्यावा व आपआपले गाव टँकरमुक्त करावे असे आवाहन केले . गेली सहा वर्ष सतत बंधारे बांधल्यामुळे नदी -ओढ्या काठच्या विहिरी व जलस्तोत्रांमंध्ये पाणी पातळी वाढल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले .नदीपात्रातील पाणी प्रवाह कमी झाल्यावर ते नदीवरही ४ बंधारे बांधणार आहेत ही बाब समाधानाची आहे . प्रारंभी माजी सरपंच रविंद्र सल्लक यांनी प्रास्ताविकात माजी प्रांत अधिकारी श्री सोपान टोंपे , माजी गटविकास अधिकारी श्री सतिश बुध्दे , माजी तहसीलदार श्री राजेंद्र पोळ यांच्या सहकार्याने केळघरमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करुन श्री कोळेकरांनीही भविष्यातील पाणीटंचाई व विकास कामांना येथील तरुणांना व ग्रामस्थांना सहकार्य करावे अशी आपेक्षा व्यक्त केली . नितीन पोतेकर यांनी सर्वांचे आभार मानले . फोटो = १ ) केळघर येथे ओढ्यांवरिल बंधाऱ्यांची पहाणी करताना श्री हनुमंत कोळेकर , राजेंद्र धनावडे, रविंद्र सल्लक ,वैभव ओंबळे व धनावडे मित्र परिवार . छाया -रघुनाथ पार्टे केळघर .

Post a Comment

0 Comments