Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ माजी आमदार संजय घाटगे.

 विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ माजी आमदार संजय घाटगे.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी 

जोतीराम कुंभार 

-----------------------------

  विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर कागल चे नाव उंचवावे. तसेच बुद्धिमान व कष्टकरी मुलांच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

   मुरगुड येथे आयोजित ५१ व्या कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे चेअरमन मंजिरीताई देसाई - मोरे होत्या.

अध्यक्ष भाषणात बोलताना मंजिरी ताई देसाई मोरे म्हणाल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा आहे . 

    गटशिक्षणाधिकारी डॉ . गणपती कमळकर यांनी प्रास्ताविक भाषणात कागल तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक क्षेत्रातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. 

    या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य एस.आर.पाटील यांनी केले. माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक 22 , उच्च प्राथमिक 115, माध्यमिक व उच्च माध्यमिक 79, शिक्षक , प्रयोगशाळा परिचर गटातून 21 अशी उपकरणांची मांडणी करण्यात आली. आहे. 

    या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी आर .एस. गावडे, शामराव देसाई, उपमुख्याध्यापक एस.बी. सूर्यवंशी पर्यवेक्षक एस.डी.साठे अविनाश चौगले टी. ए. पवार ,जी .के. भोसले, सुरेश सोनगावकर, एकनाथराव देशमुख, बाळासाहेब निंबाळकर ,पाटील एन.पी.फराक्टे, जि.टी. निकम, के.वी पाटील, अमर रजपूत,आदींसह विज्ञानप्रेमी शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.आभार उपप्राचार्य एस.पी.पाटील यांनी तर अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments