वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना हात लावलं तर गाठ माझ्याशी.... जिल्हाअध्यक्ष दिलीप बंदिचोडे.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना हात लावलं तर गाठ माझ्याशी.... जिल्हाअध्यक्ष दिलीप बंदिचोडे.
-------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई
रवि ढवळे
-------------------------------
नवी मुंबई :-नवी मुंबई मधील तुर्भे येथील बोनसरी गाव येथे गेल्या 8वर्षापासून भारिप बहुजन नावाचा बोर्ड होता, आता त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फलक करत असताना तेथील शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वार्ड अध्यक्ष यांना फलक लावण्यास मनाई केली, फलक लावल्यास हात पाय तोडण्याची भाषा केली. वंचित बहूजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हूणन तुर्भे येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर साहेब यांच्या समक्ष ताकीत दिली. या वेळी नवी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.माझ्या कार्यकर्त्याला कोणी हात लावण्याच्या प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, तसं विरोधकांना समज देण्यात आली,आमच्या कार्यकर्तेना बर वाईट झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडली तर आपण लक्ष घालावे अशी विनंती नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष म्हणून केली.
Comments
Post a Comment