पाच जणांच्या टोळीकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त.
पाच जणांच्या टोळीकडून दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त.
---------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
नांदेड प्रतिनिधी
---------------------------
विष्णुपूरी येथील काळेश्वर कामानीजवळ एका पाच जणांच्या टोळीला दोन गावठी पिस्तूल व इतर शस्त्र सापडले असून या टोळीतील सर्व आरोपींना संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलताना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपुरी येथे काही जण गावठी पिस्तूल व इतर शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर जगताप यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी त्यांच्या काही सहकारी यांना सोबत घेऊन विष्णुपुरी येथे सापळा रचला. काळेश्वर कामानीजवळ पाच जण दोन मोटारसायकल वरुन आले व ते संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सर्व आरोपी विष्णुपुरी व आसपासचे असल्याचे आढळून आले. त्यांची झडती घेतली असता आरोपी आनंद उर्फ चिनु सरदार यादव, रोहीत विजयकुमार कदम, रवि उर्फ रविलाला नारायणसिंह ठाकुर, कृष्णा पिराजी गायकवाड, प्रविण एकनाथ हंबर्डे यांच्या जवळ दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, खंजीर, तलवार, कती, लोखंडी रॉड व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. असुन दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व आरोपी विरूद्ध भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी विरूद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. या प्रकरणातील चौकशी केली असता त्यांच्या इतर सहकारी यांना ताब्यात घेतले असता आरोपी रोषन पदमवार , विशाल हंबर्डे,हरीष शर्मा, रुपेश ठाकुर, शेख जावेद यांच्याकडून तीन तोळयाची दागिने जप्त केले आहेत.सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी नायक, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व त्यांच्या कर्मचारी यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment