तालुका स्तरावरील आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार शिरोली ग्रामपंचायतील जाहीर.
तालुका स्तरावरील आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार शिरोली ग्रामपंचायतील जाहीर.
----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
----------------------------------------
शिरोली पुलाची ग्रामपंचायतला आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची ग्रामपंचायत सत्ता एक वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक आणि गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडिक गटाने एकतर्फी जिंकली होती. महाडिक कुटुंबांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने एका वर्षामध्ये गावात 25 कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच अविनाश अनिल कोळी आणि ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि शासकीय अधिकाऱ्यानी आर आर पाटील सुंदर गाव योजनेत सहभाग नोंदवला. 70000 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये महाडिक कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध योजना प्रभावीपणे राबवल्याने यावर्षीचा तालुकास्तरावरील प्रथम आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. निवड जाहीर होताच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच पद्मजा करपे, विजय जाधव, महम्मद महात, कृष्णात करपे, बाजीराव पाटील,हर्षदा यादव,सुजाता पाटील,मनीषा संकपाळ,कमल कौदाडे, वसीफा पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महादेव सुतार, शक्ती यादव, कोमल समुद्रे, आरिफ सर्जेखान, अनिता शिंदे, नजीया देसाई, धनश्री खवरे, ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment