Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवारी निढोरी येथील गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा.

 गुरुवारी निढोरी येथील गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड  प्रतिनीधी

 जोतीराम कुंभार

---------------------------

  निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा येत्या गुरुवार दि. १४ व १५ रोजी होणार असल्याची माहिती संयोजनप्रमुख राजेंद्र आप्पासाहेब सुतार व ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

          निपाणी -राधानगरी राष्ट्रीय महामार्गालगत उभारल्या गेलेल्या या मंदिरामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. सोन्याची झळाळी असणारे अतिशय सुंदर, नक्षिदार व देखणे मंदिर आदमापूरच्या बाळूमामा निर्थस्थळास भेट देणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांच्या सहजदृष्टीस येणारे आहे. गुरुवार दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वा.धार्मिक वातावरणात गावाच्या मुख्य मार्गावरून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्ग कागल रोड -लक्ष्मी नगर ते ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मार्गे गावाच्या मुख्य मार्गावरून- सुवर्ण गणेश मंदिर असा असेल. या मिरवणूकीत गावातील विविध तरुण मंडळे, संघटना, परिसरातील भजनी मंडळे व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा.

         शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री संत अमृतानंद महाराज (जंगली महाराज मठ गोरंबे) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ नंतर महाप्रसाद वाटप, माहेरवासीनींना ओटी भरणे आणि रात्री ८ पासून रात्रभर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

          ............................................

Post a Comment

0 Comments