मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड निवडणुकीत भाजपच्या विजयाचा जल्लोष.
मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड निवडणुकीत भाजपच्या विजयाचा जल्लोष.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर
-----------------------------------
ॲड.नकुल देशमुखांच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सव.
रिसोड - मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान या तीन राज्यात घवघवित यश मिळून स्पष्ट बहुमत प्राप्त केल्या बद्दल भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांच्या कार्यालय बाहेर व रिसोड शहरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.
जगातील लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पक्षाचे भारताचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मध्यप्रदेशच्या सहभागी राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंडे या सर्व नेत्यांचे नेतृत्वात प्रभावी प्रचार व चाणक्य नीति ने भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले तसेच कार्यकर्ते पदाधिकारी राज्य व राष्ट्रीय नेत्यांच्या मेहनतीमुळे मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगडमध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. याबद्दल रिसोड येथे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख ॲड नकुलदादा देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर तसेच रिसोड शहरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने फटाके फोडून व नरेंद्र मोदी चा विजयाचा जयघोष करून विजय उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून जल्लोष केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,भाजप सर्व मोर्चा,सेल,आघाडी, प्रकोष्ट अध्यक्ष,संयोजक,सहसयोंजक,तालुका पदाधिकारी,युवक,जेष्ठ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावरचा विश्वासाचा विजय - ॲड.नकुल देशमुख*
जगातील लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे देशात मोठ्या प्रमाणात असलेले विकास कार्य, प्रत्येकाच्या घरात मनात त्यांनी विश्वास निर्माण केला, देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात मोठे केले, देशातील शेवटच्या घटकापर्यंत गोरगरीब जनतेसाठी योजना राबवून देशातल्या प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळेल अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीस पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास आहे आज मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या राज्यात मोदीजी यांचे लोकप्रियता व विश्वास यामुळे त्या राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत देत भारतीय जनता पार्टीला विजयी केले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही देशातील जनता नरेंद्रजी मोदी यांना भूतो ना भविष्य स्पष्ट बहुमत देऊन विजयी करणार आहे.
Comments
Post a Comment