Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी सोयाबीन चोरीचा गुन्हा १२ तासांत उघड करून आरोपीस मुद्देमालासह केले गजाआड.

 बोरगाव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी सोयाबीन चोरीचा गुन्हा १२ तासांत उघड करून आरोपीस मुद्देमालासह केले गजाआड.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी

------------------------------

  सदर बाबत माहिती अशी की श्री. समीर शेख मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्री. किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी रेकॉर्डवरील मालाविरुद्ध दाखल गुन्ह्याची उकल करणेबाबत सूचना दिल्या होत्या. यादरम्यान दिनांक २०/१२/२०२३ रोजी रात्री बोरगाव पोलीस ठाणे अभिलेखावर ३०० किलो सोयाबीन चोरीस गेलेबाबत गु.र.नं.म ५९३/२०२३ भा द स कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सपोनी श्री. रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. दिनांक २६/१२/२०२३ रोजी बोरगाव पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून सदरची चोरी ही समीर संजय जाधव वय ३० वर्षे रा. खोडद ता.जि. सातारा याने केले असल्याची व तो चोरलेले सोयाबीन विकण्यासाठी निसराळे फाटा येथे येणार असल्याची माहिती समजली या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या सापळा कारवाई मध्ये समीर संजय जाधव हा ३०० किलो सोयाबीनच्या ६ पोत्यांसह मिळून आला. पोलिसांनी सदरचा सुमारे १५००० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

          सदर कारवाई ही श्री. समीर शेख मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्री. किरण सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांच्या सूचनेप्रमाणे व सपोनि श्री. रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बोरगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक दीपक कुमार मांडवे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, केतन जाधव हे सहभागी झाले होते. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक प्रशांत चव्हाण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments