Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा कार्यक्रम केंद्रीय सह सचिव अनिता अकेला शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

 नागाव येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचा कार्यक्रम केंद्रीय सह सचिव अनिता अकेला शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली नागाव प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

--------------------------------------

22 नोव्हेंबर 2023 पासून संपूर्ण देशभर केंद्र सरकारच्या योजनांची व विकासकामांची माहिती देण्यासाठी आपला भारत विकसित भारत यात्रा सुरू आहे.प्रत्येक तालुक्यामध्ये या यात्रेद्वारे प्रत्येक गावामध्ये चित्ररथ जाऊन केंद्र सरकारच्या योजनेची व विकासकामांची माहिती देऊन त्याठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शुक्रवार दि.22 डिसेंबर 2023 रोजी हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे सायंकाळी 4 वाजता आपला भारत विकसित भारत या चित्ररथाचे आगमन झाले.नागाव च्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रथाचे पूजन केंद्रीय सह सचिव अनिता शहा अकेला व सरपंच सौ अनिल विमल शिंदे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावर म्हणाले की ,शासनाच्या योजना तळागाळापर्यत,शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर प्रशासन कटिबद्ध आहे. लोकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी शासनाच्या विविध योजनेच्या लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.तसेच राष्ट्रीय व राज्य शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक रथाचे अँकर स्वप्नील पोवार यांनी केले.तसेच त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थींशी संवाद साधला.सूत्रसंचालन प्रशांत कुंभार सर यांनी केले. तर आभार सरपंच विमल शिंदे यांनी मांडले.यावेळी सहसचिव केंद्र सरकार मा.अनिता शहा अकेला , जिल्हाधिकारी मा. राहूल रेखावर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा.अरुण जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मा.संजय तेली,डॉ संजयदादा पाटील, उपाध्यक्ष भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र उप विभागीय अधिकारी,इचलकरंजी मा. मौसमी चौगुले, तहसीलदार, हातकणंगले मा.कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती हातकणंगले मा. शबाना मोकाशी,ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे,तलाठी सिकंदर पेंढारी,नागाव च्या लोकनियुक्त सरपंच सौ विमल शिंदे, उपसरपंच सुधीर ऊर्फ बंटी पाटील,भाजप महिला जिल्हा कार्यकारिणी सचिव अश्विनी पाटील, भाजपा नागाव अध्यक्ष श्री सतिष माळी माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी , प्रकाश पोवार ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर , अभिनंदन सोळाकुरे , सौ सुलोचना कांबळे सौ मनीषा पाथरे सौ शुभांगी पोवार सदस्या,विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments