Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दत्त जयंती मौजे केसकरवाडी येथे उत्सवात साजरी.

 दत्त जयंती मौजे केसकरवाडी येथे उत्सवात साजरी.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

 प्रमोद पंडीत

----------------------------------

मौजे केसकरवाडी ता. जावळी ,जि .सातारा येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम उत्सवात साजरे केले .

गेली ५४ वर्षे दत्त जयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आले .

सालाबाद प्रमाणे ५५ वे अखंड हरिनाम सप्ताह २० / १२ / २० २३ ते २६ / १ 2 / 2023 या सप्ताहात ज्ञानेश्वरीचे वाचन , काकड आरती , प्रवचन , व किर्तन घेवून केसकरवाडी व पंचक्रोशीत हरिनामाचा गजर करून सारा परिसर दुमदुमून गेला . दत्त भक्त अखंड भक्ती सागरात डुबून गेले .

दत्त जयंती दिवशी सकाळी ७:00 वाजता दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला . ८ ते ९ पारायण सांगता होम हवन , दुपारी १ ते ३ ह भ प अतुल महाराज देशमुख (गांजे ) विश्वंभरबाबा आधात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा यांचे काल्याचे किर्तन व सायकांळी श्री माऊलीची व दत्त महाराजाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली पंचक्रोशीतील दत्त भक्ताना महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला .

या सर्व कार्यक्रमाचे अयोजन श्री सिध्दी विनायक मित्र मंडळ केसकरवाडी व ग्रामस्थ मंडळ केसकर वाडी यांनी केली .

Post a Comment

0 Comments