नागाव येथे आयशर गाडीच्या गॅरेज ला आग,अंदाजे 40 ते 45 लाखांचे नुकसान.
नागाव येथे आयशर गाडीच्या गॅरेज ला आग,अंदाजे 40 ते 45 लाखांचे नुकसान.
---------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
---------------------------------
नागाव,ता.हातकणंगले येथे सुभाष बिडकर यांच्या मालकीच्या जागेत महेश घाडगे आणि सचिन हंजे यांचे श्री दत्त ऑटो नावाने आयशर गाड्या दुरुस्ती चे गॅरेज आहे. आज सायंकाळी 8 वाजता गॅरेज बंद करून कामगार व गॅरेज मालक घरी गेले होते.साधारणतः 8.30 च्या सुमारास गॅरेज मध्ये शॉर्टसर्किट होऊन गॅरेज ला आग लागली. या घटनेची माहिती शेजारील गोडावून मधील कर्मचाऱ्यांनी गॅरेज मालकास दिली.तसेच अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला कळविली.घटनेची माहिती कळताच कोल्हापूर महानगरपालिका व पेठवडगाव नगरपालिका यांचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच शिरोली एम आय डी सी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी घटनास्थळी आले.अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, स्थानिक नागरिक यांनी आग विझविण्यासाठी श्रम घेतले. या आगीमध्ये ऑइल चे ड्रम,कॉम्प्रेशर,वायरिंग चे मटेरियल, बॅटरी,स्पेअरपार्ट याच्यासह गॅरेज पत्रे जळाले आहेत.आगीमध्ये साधारणपणे 40 ते 45 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.यावेळी गॅरेज च्या बाहेर दुरुस्ती साठी आलेल्या गाड्या उभ्या होत्या,वेळेवर आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Comments
Post a Comment